ज्ञानदा रामतीर्थकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
आजवर ज्ञानदा रामतीर्थकरने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मात्र, 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत अपूर्वा नावाचं पात्र साकारुन ती घराघरात पोहोचली.
सध्या अभिनेत्री 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
या मालिकेतील तिच्या भूमिकेला सगळ्यांची पसंती मिळते आहे.
ज्ञानदाचा जन्म २६ जून १९९६ मध्ये झालाय. सध्या तिचं वय २९ वर्षे आहे.
२०१६ मध्ये ती टीव्ही इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आली. त्यानंतर तिच्या अभिनय प्रवासाला सुरूवात झाली.
अगदी अल्पावधीतच ज्ञानदाने प्रसिद्धीचं शिखर गाठलं. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.