'लग्नाची बेडी' मालिकेतील सिंधू आता काय करते?

सायली देवधर हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. 

'लेक माझी लाडकी', 'जुळून येती रेशीमगाठी' सारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

स्टार प्रवाहच्या 'लग्नाची बेडी' या मालिकेतून ती नावारुपाला आली. या मालिकेमुळे सायली देवधर घराघरात पोहोचली.

'लग्नाची बेडी' मध्ये तिने साकारलेलं सिंधू नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं.

सायली आजही सिंधू या तिच्या पात्रामुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. 

दरम्यान, ही मालिका संपली असली अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 

अलिकडेच सायली देवधर 'स्मार्ट सुनबाई' या चित्रपटात दिसली.तसेच 'देवखेळ' या सीरिजमध्ये देखील तिने छोटेखानी भूमिका साकारली होती.

आता ती कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...!

Click Here