छोट्या पडद्यावरील 'कमळी' मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.
या मालिकेचं वेगळं कथानक आणि कलाकारांचा सुंदर अभिनय यामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.
दरम्यान, या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर कमळी ही मुख्य भूमिका साकारत आहे.
मालिकेत साधा फ्रॉक आणि दोन वेण्यांमध्ये असलेली कमळी मालिका रसिकांना भावली आहे.
सध्या या अभिनेत्रीने नवरात्रीनिमित्त सुंदर फोटोशूट केलं आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे.
झी मराठीच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून त्यावर मराठमोळे दागिने परिधान करुन अभिनेत्रीने लूक पूर्ण केला आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसतेय.