छोट्या पडद्यावरील खलनायिका म्हणून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे प्रतिक्षा मुणगेकर.
'मुलगी झाली हो', 'जीव माझा गुंतला' यांसारख्या मालिकांमध्ये खलनायिकेचं पात्र साकारून प्रतिक्षा घराघरात पोहोचली आहे.
सध्या ही अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत ऐश्वर्या नावाची भूमिका साकारतेय.
प्रतिक्षा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले फोटो चर्चेत आले आहेत.
लाल रंगाची सुंदर साडी, केसांचा अंबाडा आणि त्यावर गजरा माळून तिने शृंगार केला आहे.
अभिनेत्री या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.