अश्विनी कासार ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ती कलाविश्वात काम करत असून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
'कमला' या मालिकेतून अश्विनीने तिच्या करिअरला सुरुवात केली.
या मालिकांव्यतिरिक्त तिने 'मोलकरीण बाई', 'कट्टी बट्टी' या मालिकांमध्येही काम केलंय.
अश्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नवीन प्रोजेक्टबरोबरच ती वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच अश्विनीने सोशल मीडियावर तिचे स्टायलिश लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
अश्विनीचं हे हटके फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.