अनुष्का पिंपुटकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'रंग माझा वेगळा' मालिकेत कार्तिक-दीपाची लेक कार्तिकीची भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली.
सध्या अनुष्का 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
या मालिकेत ती साकारत असलेली आरुषी मोहिते ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली आहे.
अनुष्का सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे मराठमोळ्या अंदाजातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जांभळ्या रंगाची नऊवारी साडी त्यावर साजेसा शृंगार करुन अभिनेत्रीने लूक पूर्ण केला आहे.
अनुष्का या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.