'अबोली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.
मालिकेत गौरीने साकारलेलं 'अबोली' नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.
दरम्यान, या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी गौरी वेगवेगळ्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
सोशल मीडियावरही गौरी कमालीची सक्रिय असते. नुकतंच तिने पारंपरिक अंदाजात फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीने नऊवारी साडी परिधान करून खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी ऑफ व्हाईट रंगाची नऊवारी साडी, नाकात नथ आणि गळ्यात सुंदर नेकलेस असा खास लूक तिने केला आहे.
गौरी कुलकर्णी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.