अभिनेत्री गौरी कुलकर्णी हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
अबोली मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असली तरी गौरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अबोली मालिकेत साधीसुधी दिसणारी ही नायिका खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
या फोटोशूटसाठी तिने मरून शॉर्ट पॅन्ट आणि राखाडी रंगाची हुडी परिधान केली आहे.
गौरीचा हा हटके अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. या फोटोंमध्ये ती फारच सुंदर दिसतेय.