वैदेही परशुरामी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'वेड लावी जीवा' या चित्रपटातून वैदेहीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
वैदेही परशुरामीचे अनेक चाहते आहेत. वैदेही तिच्या सौंदर्यामुळे आणि गोड हसण्याने अनेकांना प्रेमात पाडते.
दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी ही नायिका सध्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
मरुन रंगाची साडी नेसून त्यावर पारंपरिक दागिने असा साजशृंगार करत वैदेहीने लूक पूर्ण केला आहे.
या फोटोवर वैदेहीच्या चाहत्यांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
वैदेहीचं या फोटोंमधील मनमोहक हास्य पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.