सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.
आजवर तिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून चाहत्यांची मनं जिंकली.
हल्ली सोनाली कुलकर्णी चित्रपटांबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या संपर्कात असते.
सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच सजग असते.
नुकतंच सोनाली कुलकर्णीने नवं फोटोशूट केलं आहे.
सोनालीने सुंदर साडी परिधान करुन फोटो शेअर करीत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या लूकसाठी सोनालीने नाकात घातलेली नथ विशेष आकर्षण ठरते आहे.
सोनाली या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.