मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी.
आपल्या उत्तम अभिनयासह उत्कृष्ट नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं.
सोनाली कुलकर्णीने आजपर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.
सोनाली कुलकर्णी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.
नुकतंच अभिनेत्रीने एक खास फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
फिकट हिरव्या रंगाची साडी, कानात झुमके तसेच मोकळे केस सोडून सोनालीने लूक पूर्ण केला आहे.
सोनाली कुलकर्णीचं हे सुंदर फोटोशूट पाहून त्यावर कलाकार मंडळींनीही कमेंट केल्याच्या पाहायला मिळत आहेत.