मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव ही मनोरंजनविश्वातील नावाजलेली नायिका आहे.
आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.
झी मराठी वाहिनीवरील 'काहे दिया परदेस' या मालिकेतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्रीचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे.
सायलीने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांसह चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
सायली संजीवचा जन्म ३१ जानेवारी १९९३ मध्ये झालाय. सध्या तिचं वय ३२ वर्ष आहे.
'झिम्मा २','गोष्ट एका पैठणीची', 'ओले आले','मन फकिरा',अशा सिनेमांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.