प्रिया बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक नाव आहे.
प्रियाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे.
आपला सहज सुंदर अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
सध्या प्रिया बापट तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
गुलाबी साडीतील अभिनेत्रीचा हा अनोखा अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
प्रियाचे हे खास फोटो पाहून नेटकरी सुद्धा घायाळ झाले आहेत.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.