प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे.
प्राजक्ताचा चाहतावर्ग देखील फार मोठा आहे.
'जुळून येती रेशीम गाठी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
सोशल मीडियावरील विविध फोटो, व्हिडीओंमुळे ती चर्चेत येत असते.
अशातच नुकतेच तिने खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.
या फोटोशूटसाठी फ्लोरल ड्रेस त्यावर ओढणी परिधान करून प्राजक्ताने तिचा लूक पूर्ण केला आहे.
प्राजक्ता माळीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.