तुझ्या रंगी सांज रंगली...!

महाराष्ट्राची 'कलरफूल' अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं.

'क्षणभर विश्रांती', 'दगडी चाळ', 'भेटली तू पुन्हा' या चित्रपटांद्वारे तिने सिनेरसिकांच्या मनात हक्क्ची जागा निर्माण केली.

पूजा अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. 

पूजा तिच्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

नुकतंच तिने साडी परिधान करुन खास फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तपकिरी रंगाची साडी नेसून शृंगार  केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे गं अंतर्यामी!

Click Here