गौरी नलावडे ही मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची नायिका आहे.
सध्या ही अभिनेत्री 'वडापाव' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
'वडापाव'मधील कौटुंबिक नात्यांचे गोड–तिखट वळणं, हास्याची खमंग फोडणी आणि भावनिक प्रसंगांचा स्पर्श प्रेक्षकांच्या मनाला भिडतो.
दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने गौरीने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
जांभळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये तिने हे सुंदर फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमधील अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
गौरीने या ग्लॅमरस फोटोशूटला "No rush…", असं कॅप्शन दिलं आहे.