'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे.
मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असलेली साक्षी प्रेक्षकांचं नेहमीच लक्ष वेधून घेत असते.
'ठरलं तर मग' मध्ये साक्षी शिखरेची भूमिका साकारुन केतकी विलास घराघरात पोहोचली.
केतकीला या भूमिकेने लोकप्रियता मिळवून दिली आहे.
सध्या ही अभिनेत्री तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
या फोटोशूटसाठी तिने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसून साजशृंगार केला आहे.
फोटोंमधील अभिनेत्रीचा मराठमोळा लूक पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.