मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी लोणारी.
मराठी मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
अलिकडेच ती स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत दिसली.
सध्या अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमधील तिचा साधेपणा,देखणा लूक चाहत्यांच्या मनात घर करत आहे.
ज्यामध्ये ती पारंपरिक अंदाजात पाहायला मिळते आहे.
सुंदर साडी, केसात गजरा नाकातील नथीमुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसतो आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.