मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.
'खुलता कळी खुलेना', 'तुला पाहते रे', 'तू तेव्हा तशी', 'रंग माझा वेगळा' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
सध्या ही अभिनेत्री तारिणी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
या मालिकेत ‘कौशिकी खांडेकर’ ही भूमिका ती साकारते आहे.
नुकतेच अभिज्ञाने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
या फोटोंमध्ये ती ऑफ शोल्डर टॉप, डेनिम जिन्स आणि डोळ्यांना गॉगल अशा स्टाईलिस्ट लूकमध्ये पाहायला मिळते आहे.
अभिज्ञाच्या या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये अभिज्ञा कमालीची सुंदर दिसतेय.