मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तन्वी मुंडले.
तन्वीने आजवर नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
'पाहिले न मी तुला',' भाग्य दिले तू मला' यांसारख्या मालिकांमध्ये आपण तन्वीला अभिनय करताना पाहिलंय.
सध्या तन्वी रंगभूमीवर सक्रिय असल्याची पाहायला मिळतेय.तिचं 'कुटुंब कीर्रतन' हे नाटक जोरदार सुरु आहे.
दरम्यान, अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
गळ्यात नेकलेस, हटके हेअरस्टाईल आणि साडी परिधान करून अभिनेत्रीने हा लूक पूर्ण केला आहे.
तन्वीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.