अप्सरेचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिची फॅशन चाहत्यांना आवडली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सोनाली कुलकर्णीने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. नटरंग, बकुळा नामदेव घोटाळे हे तिचे गाजलेले सिनेमे.
सोनालीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन ती चाहत्यांना अपडेट्स देत असते.
नुकतंच तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनालीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.
सोनालीने जम्पसूटमध्ये वेस्टर्न लूक केल्याचं दिसत आहे.
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.