सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.
सोनालीने आपलं निखळ सौंदर्य आणि सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
दरम्यान,आपल्या अभिनयासह चित्रपटांमुळे चर्चेत राहणारी ही अभिनेत्री तिच्या एका लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच सोनालीने सोशल मीडियावर तिचे साडीमधील काही नवे आणि अतिशय सुंदर असे फोटो शेअर केले आहेत.
तिने गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर साजेसा लूक करत फोटोशूट केलंय.
तसेच या फोटोंमध्ये सोनालीचे खळखळून हसण्याचे क्षण कॅमेऱ्यात टिपले गेले असून तिचं हे सौंदर्य चाहत्यांना भावलं आहे.
अभिनेत्री या फोटोंमध्ये फार सुंदर दिसत असून तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.