स्नेहलताने नुकतंच केलेलं फोटोशूट पाहून सोयराबाईंची आठवण चाहत्यांना झाली आहे.
स्नेहलता वसईकर हा मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत स्नेहलताने साकारलेली महाराणी सोयराबाई ही भूमिका सगळ्यांच्याच लक्षात राहिली.
नवरात्रीनिमित्त स्नेहलताने निळ्या रंगाच्या नऊवारी साडीत फोटोशूट केलं आहे.
पारंपरिक दागिन्यांचा साज आणि केसांत गजरा माळत तिने मराठमोळा लूक केला आहे.
या फोटोंमध्ये स्नेहलताचा शाही थाट पाहायला मिळत आहे.
"कधी कधी हरवून जाणं म्हणजे स्वतःला नव्याने शोधणं!", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.