साडीमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून आल्याचं पाहायला मिळत आहे.
श्वेता शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती निर्मातीदेखील आहे.
श्वेता सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
पैठणी साडीत श्वेताने खास लूक केल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.
केसांत गजरा माळल्याने श्वेताच्या सौंदर्यात भर पडली आहे.
श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
श्वेता शिंदेने लागिर झालं जी, अप्पी आमची कलेक्टर, देवमाणूस यासारख्या मालिकांची निर्मिती केली आहे.