पहिल्यांदाच श्रुतीचा वेगळा लूक दिसत आहे.
श्रुती मराठेने मराठीसोबत साऊथ सिनेमांमध्येही काम केलं आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
श्रुतीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पहिल्यांदाच श्रुतीचा वेगळा लूक दिसत आहे.
हिरव्या रंगाचा लेहेंगा तिने परिधान केला आहे. तर साजेसा मेकअप केला आहे.
भरजरी दागिने आणि केसांत गुलाबाची फुले माळल्याने श्रुतीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
श्रुतीला राधा ही बावरी मालिकेने प्रसिद्धी मिळवून दिली. आता ती एक निर्मातीदेखील आहे.