अभिनेत्री शिवानी सुर्वे हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
अभिनेत्री शिवानी सुर्वे हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
'झिम्मा २', 'वाळवी', 'ट्रिपल सीट' हे शिवानीचे गाजलेले सिनेमे आहेत. पण शिवानीने करिअरची सुरुवात मालिकेतून केली.
२०१२ मध्ये 'देवयानी' या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत होती. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.
'देवयानी' ही शिवानीची पहिली मालिका होती. त्यानंतर 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत ती दिसली.
'अनामिका', 'जाना ना दिल से दूर', 'एक दिवाना था' या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.
शिवानी 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. या पर्वातील ती चर्चेचा चेहरा होती.