अभिनेत्री शिवानी सुर्वे या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
सध्याच्या घडीला शिवानीची गणना मराठी कलाविश्वातील आघाडींच्या नायिकांमध्ये केली जाते.
आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने रसिकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
शिवानी सुर्वेने अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.
शिवानी सुर्वेचा जन्म २९ ऑगस्ट १९९३ साली झाला.
शिवानी सध्या ३२ वर्षांची आहे.
२०११ साली 'फुलवा' मालिकेत सहकलाकाराची भूमिका साकारल्यानंतर तिला 'देवयानी' मालिकेत मुख्य भूमिका मिळाली.
'देवयानी' ही मालिका शिवानीच्या करिअरला कलाटणी देणारी ठरली.