मराठी अभिनेत्रींचे देश -विदेशात फिरतानाचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
कित्येक अभिनेत्री वेगवेगळी ठिकाणं एक्स्प्लोर करत असतात आणि सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो शेअर करतात.
अशाच एका मराठी अभिनेत्रीच्या थायलंडमधील फोटोंनी लक्ष वेधून घेतलं.
सुंदर समुद्रकिनारा आणि क्युट आऊटफिटमध्ये अभिनेत्रीने फोटो शेअर केले आहेत.
ही अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारते आहे.
सध्या रुचिरा थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
नुकतेच तिने थायलंडमधील व्हेकेशनचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
थायलंडमधील रुचिराच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.