गौरी गणपती जवळ येत आहेत. अशावेळेस सेलिब्रिटीसारखा लूक करावा असं तुम्हालाही वाटत असेल.
तेव्हा गौरी गणपतीला तुम्ही अभिनेत्री रेवती लेलेसारखा खास लूक करू शकता.
रेवतीने नुकतेच पारंपरिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर डिझाईन ब्लाऊज परिधान केला आहे.
केस मोकळे सोडत साधेसा मेकअप केला आहे.
यावर तिने खड्यांची ज्वेलरी घातली आहे. नाकात नथ आणि हातात बांगड्या घातल्या आहेत.
या पारंपरिक लूकमध्ये रेवती खूपच सुंदर दिसते आहे.