'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर.
प्रियदर्शिनी इंदलकर ही आजच्या घडीला मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची नायिका आहे.
हल्ली अभिनेत्री सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असल्याची पाहायला मिळतेय.
आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या नायिकेने नुकतंच एक खास फोटोशूट केलं आहे.
तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियदर्शिनी अतिशय सुंदर दिसत आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
प्रियदर्शिनीने या फोटोंना ‘अधीर मनाच्या वेड्या भावना’ असं कॅप्शन दिलं आहे.