हातात वॉकर घेऊन का चालतेय प्रार्थना?

प्रार्थनाने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती हातात वॉकर घेऊन चालताना दिसत आहे. 

प्रार्थना बेहेरे ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच प्रार्थनाच्या पायाला दुखापत झाली होती. तिच्या गुडघ्याची सर्जरी झाली होती. 

त्यामुळे अभिनेत्रीला आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. 

आता हळूहळू प्रार्थनाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अभिनेत्रीने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहेत.

प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती हातात वॉकर घेऊन चालताना दिसत आहे. 

तिच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी काळजी व्यक्त करत Get well soon म्हटलं आहे. 

Click Here