वर्ल्ड इमोजी डे निमित्त प्राजक्ताने खास पोस्ट केली आहे.
आज वर्ल्ड इमोजी डे आहे. रोज चॅटिंग करताना आपण वेगवेगळे इमोजी वापरुन भावना व्यक्त करतो.
प्राजक्ता माळीने तिच्या वेगवेगळ्या एक्स्प्रेशनचे इमोजी शेअर केले आहेत.
यामध्ये तिने फोटोंमधील तिचे वेगवेगळे हावभाव इमोजीसहित शेअर केले आहेत.
व्हॉट्सअपचे इमोजी प्राजक्ताच्या एक्स्प्रेशनला हुबेहुब मॅच करत असल्याचं दिसत आहे.
असं वाटतंय की हा इमोजी प्राजक्ताच्या या फोटोवरुनच बनवला गेला आहे.
तुम्हाला प्राजक्ताच्या फोटोचा कोणता इमोजी जास्त आवडला?