प्राजक्ताच्या सौंदर्यावरुन चाहत्यांची नजर हटता हटत नाहीये.
प्राजक्ता माळी हा मराठी सिनेसृष्टीतील लाडका चेहरा. अभिनयासोबतच ती फॅशनसाठीही ओळखली जाते.
प्राजक्ताचा स्वत:चा ज्वेलरी ब्रँड आहे. अभिनेत्रीने नुकताच केलेला लूक फारच सुंदर दिसत आहे.
प्राजक्ताने पिवळ्या रंगाची साडी नेसून फोटोशूट केलं आहे.
तिने पैठणीची डिझाइन असलेला ब्लाऊज परिधान केला आहे. गळ्यात मोहनमाळ घातली आहे.
केसांचा बन बांधून गुलाबाची फुलं प्राजक्ताने माळली आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.