अभिनयासोबतच प्राजक्ता तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जुळून येती रेशीमगाठीमधून प्राजक्ता घराघरात पोहोचली.
नुकतंच प्राजक्ताने सोनेरी रंगाच्या गाऊनमधील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्राजक्ता सोन्याहून पिवळी वाटावी अशी दिसत आहे.
बन बांधून आणि मोठे कानातले घालून प्राजक्ताने ग्लॅमरस लूक केल्याचं दिसत आहे.
प्राजक्ताच्या या फोटोंवरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीये. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.