मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे पल्लवी पाटील.
अनेक मराठी मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
पल्लवीने 'रुंजी','बापमाणूस', 'अग्निहोत्र 2', 'वैदही' अशा मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
सध्या ही अभिनेत्री सोशल मीडियावरील तिच्या दाक्षिणात्य लूकमधील फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
पांढरी साडी त्यावर साजेसे दागिने परिधान करुन अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे.
तसेच हातात कमळाचं फुल घेत या फोटोशूटसाठी तिने पोज दिल्या आहेत.
पल्लवीच्या या सुंदर फोटोंवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.