साठीतही इतक्या सुंदर कशा दिसतात निवेदिता?

आज वयाची साठी पार केली तरी निवेदिता यांचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. 

निवेदिता सराफ या मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. ८०-९०चं दशक त्यांनी गाजवलं. 

'माझा छकुला', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' हे त्यांचे गाजलेले सिनेमे. 

अभिनयासोबतच चर्चा व्हायची ती निवेदिता सराफ यांच्या सौंदर्याची. 

आज वयाची साठी पार केली तरी निवेदिता यांचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. 

आजही त्या तितक्याच सुंदर दिसतात आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडतात. 

निवेदिता सराफ या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

त्यांच्या 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. 

बनवाबनवीमधल्या सुधाचा AI अवतार!

Click Here