मराठीसह हिंदी, तमिळ ,तेलुगू सिनेइंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.
अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या अभिनयासह बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.
नेहाने आजपर्यंत अनेक मालिका तसंच चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
नेहा पेंडसे सध्या सिनेइंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन अभिनेत्रीने हे खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.