मीरा जोशी ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
विविध मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून ती घराघरात पोहोचली.
मीरा जोशीने आपला दमदार अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
मीरा जोशी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते.
या माध्यमातून अभिनेत्री तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.
सध्या या अभिनेत्रीचं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
पांढऱ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी परिधान करून त्यासाठी हटके पोझ देत तिने हे फोटोशूट केलंय.
या पारंपरिक पेहरावात मीरा अतिशय सुंदर दिसते आहे.