मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे मधुराणी प्रभुलकर.
मधुराणीने आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
मात्र, 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली.
आता लवकरच ही अभिनेत्री 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
दरम्यान, नुकतंच मधुराणी प्रभुलकरने एक खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी तिने गडद हिरव्या रंगाची साडी तसेच पांढरा शर्ट परिधान करुन तिने इंडो-वेस्टर्न लूक केला आहे.
या फोटोंमधील अभिनेत्रीचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.