ओळखलंत का या क्युट चिमुकलीला? गाजवतेय छोटा पडदा 

मनोरंजन विश्वातील कलाकारांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मात्र, त्यांच्या लहानपणीच्या फोटोंना सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. हे कलाकार अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचे थ्रोबॅक फोटो शेअर करून प्रसिद्धीझोतात येतात. 

अशातच सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्रीचा फोटो समोर आला आहे. ही अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर.

मधुराणीचा हा बालपणीचा फोटो पाहून चाहते तिला ओळखू शकले नाहीत.

मधुराणी प्रभुलकर ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

 स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं.

लवकरच ती 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

शर्वरी जोगची पहिली मालिका कोणती?

Click Here