ईशा केसकर मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
ईशा केसकर छोट्या पडद्यावरील 'जय मल्हार', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमुळे घराघरांत पोहोचली.
त्यानंतर 'सरला एक कोटी' या चित्रपटात ईशाने महत्त्वाची भूमिका साकारली.
सध्या ही अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत कला नावाची भूमिका साकारते आहे.
तिच्या या पात्राला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळते आहे.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आहे.
काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर क्रॉप टॉप आणि मॅचिंग हाय-वेस्ट स्कर्ट परिधान करुन ईशाने सुंदर फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीचा हा हटके लूक पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.