सध्या मराठी मालिकाविश्वात अभिनेत्री कृतिका देवच्या नावाची चर्चा आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील आगामी 'लपंडाव' या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या मालिकेत कृतिकासह अभिनेत्री रुपाली भोसले आणि चेतन वडनेरेची देखील प्रमुख भूमिका आहे.
सध्या कृतिका तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
या फोटोशूटसाठी कृतिकाने सुंदररित्या घागरा चोळी परिधान करुन साजशृंगार केला आहे.
कृतिका या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. तिचं फोटोशूट नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं आहे.