'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री कोमल कुंभार नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली.
'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत अंजीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री कोमल कुंभार नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली.
दिग्दर्शक गोकुळ दशवंतसोबत कोमलने सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
कोमल आणि गोकुळ यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षणांचे फोटो समोर आले आहेत.
लग्नासाठी कोमल आणि गोकुळ यांनी हिरव्या रंगाची थीम केली होती.
कोमलने पोपटी रंगाची साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, नाकात नथ अशा वधूच्या गेटअपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
तर गोकुळने तिला मॅचिंग होईल असा पोपटी रंगाचा फेटा आणि शेला घेतला होता.
त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.