गिरीजा प्रभू ही मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक गुणी अभिनेत्री आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
सध्या 'कोण होतीस तू काय झालीस' मालिकेत कावेरी नावाची व्यक्तिरेखा ती साकारते आहे.
तिच्या या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.
गिरीजा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. त्याद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतंच अभिनेत्रीने 'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५' निमित्ताने सुंदर फोटोशूट केलं आहे.
या गणेशोत्सवासाठी गिरीजाने केशरी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता.
या लूकमध्ये गिरीजा अतिशय सुंदर दिसते आहे.