अश्विनी महांगडे ही मराठी कलाविश्वातील एक गुणी अभिनेत्री आहे.
मालिका आणि चित्रपट अशा माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री कायम चर्चेत असते.
सध्या अश्विनी महांगडे 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत काम करताना दिसते आहे.
या मालिकेतील तिच्या मायाच्या नावाच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अश्विनीने नुकतेच काळ्या रंगाच्या साडीतील काही मोहक फोटो शेअर केले आहेत.
अश्विनीच्या या लूकला नेटकऱ्यांनी पसंतीची पावती दिली आहे.
"जो चाहिए, उसकी शुरुआत हो चुकी है…", असं सुंदर कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.