दिशा परदेशी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'स्वाभिमान', 'लाखात एक आमचा दादा' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये ती झळकली आहे.
अभिनयाशिवाय दिशा मॉडेलिंग सुद्धा करते.
सध्या अभिनेत्री आपल्या कामातून ब्रेक घेत अध्यात्मिक नगरी वाराणसीत रमली आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर गंगा नदीच्या किनाऱ्यावरील मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
दिशाने होडीत बसून सुंदर फोटो क्लिक केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने नक्षीकाम केलेली सुंदर साडी परिधान केली आहे.
दिशा परदेशीचे हे फोटो अनेकांच्या पसंतीस उतरले आहेत.