मराठी अभिनेत्रीच्या फोटोशूटची होतेय चर्चा!
दिशा परदेशी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत तुळजाची भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली.
त्या भूमिकेतून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.
सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
दिशा परदेशी तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसते.
नुकतेच दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर इटलीतील व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
"Seas the day!" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
या फोटोंमधील अभिनेत्रीच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.