भाग्यश्री मिलिंद ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
भाग्यश्रीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय.
'बालक-पालक', 'आनंदी गोपाळ' यांसारख्या चित्रपटातून अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद घराघरात पोहोचली.
तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक झालं होतं.
भाग्यश्री सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. त्याद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
सुंदर साडी परिधान करुन भाग्यश्रीने निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.