कलाविश्वात सक्रीय असलेली शिवानी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव्ह आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिवानी नाईक.
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत दमदार भूमिका साकारत शिवानी घराघरात पोहोचली.
शिवानीने अलिकडेच केलेलं एक फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.
शिवानीने क्लासी अंदाजात फोटोशूट केलं असून यात ती कमालीची सुंदर आणि कॉन्फिडंट वाटत आहे.
शिवानीने काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे. सोबतच अगदी मोजका मेकअप केला आहे.
शिवानी लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अमित रेखी या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.