अनघा भगरे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'रंग माझा वेगळा' मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
या मालिकेत तिने साकारलेलं श्वेता नावाचं पात्र आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.
नुकतंच अनघाने पारंपरिक अंदाजात फोटोशूट केलंय.
या फोटोशूटसाठी अनघाने गडद मरून रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे.
अभिनेत्रीचा हा मराठमोळा पेशवाई थाट सध्या खूप लक्ष वेधून घेत आहे.
अनघा भगरे या लूकमध्ये फार सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केलाय.